Ladki Bahin Yojana eKYC: लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन अपडेट समोर आले आहे. आता सर्व पात्र लाडक्या बहिणींना eKYC करणे बंधनकारक आहे. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यात अतिशय प्रसिद्ध झालेली योजना आहे. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरु केलेली हि योजना आता नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. सुरुवातीला या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला, पण त्याचबरोबर अनेक गैरप्रकार देखील उघड झाले. काही पुरुषांनी खोटी माहिती देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न केला, तर काही शासकीय महिला अधिकाऱ्यांनीही चुकीच्या पद्धतीने योजनेचा फायदा घेतल्याची प्रकरणे समोर आली.
यामुळे सरकारने या योजनेचे निकष अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला असून ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया आता बंधनकारक करण्यात आली आहे. यामुळे खरंच पात्र असलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल, असा सरकारचा उद्देश आहे.
Ladki Bahin Yojana eKYC म्हणजे काय? (थोडक्यात माहिती)
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता पर्यंत राज्यातील सर्व महिलांना लाभ मिळत होता. परंतु यात काही लोकांनी गैफायदा घेतल्यामुळे आता फक्त लाभार्थी पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा अशी सरकारने केलेली घोषणा आहे. eKYC मुळे फक्त लाभार्थी महिलांचे हफ्ते सुरु राहतील बाकी सर्व महिलांना या योजनेतून वंचित केल्या जाणार आहे.
सरकारचे नवे पाऊल
महायुती सरकारच्या या लोकप्रिय योजनेत फसवणूक थांबवण्यासाठी प्रशासन आता अलर्ट मोडवर आले आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थी महिलेसाठी ई-केवायसी करणे आता अनिवार्य आहे. हे पाऊल पारदर्शकता राखण्यासाठी आणि खरी पात्र महिलांपर्यंतच मदत पोहोचवण्यासाठी उचलण्यात आले आहे.
दोन महिन्यांची मुदत
सध्या सणासुदीचा काळ लक्षात घेऊन सरकारने महिलांना ई-केवायसीसाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. मात्र, उशीर न करता वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. जर वेळेत ई-केवायसी पूर्ण केले नाही, तर योजनेचा पुढील हप्ता थांबण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana eKYC कशी करावी? प्रक्रिया काय आहे?
ई-केवायसीची प्रक्रिया अगदी सोपी आहे. महिला स्वतः ऑनलाईन किंवा जवळच्या CSC सेंटरवर जाऊन ती पूर्ण करू शकतात.
- ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करा.
- ई-केवायसीसाठी सुरू होणाऱ्या पॉपअप विंडोवर क्लिक करून नोंदणी सुरू करा.
- नाव, पत्ता, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि उत्पन्नाचे तपशील यासह आवश्यक माहिती अपलोड करा.
- प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे ई-केवायसी यशस्वी असल्याची पुष्टी मिळेल.
निष्कर्ष
लाडकी बहीण योजनेचे हफ्ते सुरु ठेवण्यासाठी सर्व पात्र लाडक्या बहिणी Ladki Bahin Yojana eKYC ची प्रक्रिया पूर्ण करा. अगदी मोफत हि प्रक्रिया केल्या जाऊ शकते, फक्त तुमच्याकडे सर्व आवश्यक दस्तऐवज असणे आवश्यक आहे.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!