Maharashtra ST Pravas Yojana हि योजना महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) अंतर्गत राबवण्यात येत आहे. महाराष्ट्र एसटी प्रवास योजना हि राज्यातील महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी, कामगार, शेतकरी अशा अनेक गटांसाठी सुरु केलेली योजना आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला 1814 रुपयांचा पास घ्यावा लागेल. एकदा हि पास घेतल्यानंतर तुम्ही राज्यात कुठे पण प्रवास करू शकता.
राज्यातील अनेक गरजू लोकांसाठी किंवा ज्यांना फिरायला खूप आवडते अशा नागरिकांसाठी मुख्यतः हि योजना सुरु केली आहे. आजचा या लेख मधून आपण जाणून घेऊ तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा याची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.
Maharashtra ST Pravas Yojana 2025 | महाराष्ट्र एसटी प्रवास योजना म्हणजे काय?
महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (MSRTC) हि पूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांसाठी वाहतूक सेवा पुरवणारी संस्था आहे. या संस्थेने नागरिकांना कमी पैशा मध्ये सुविधा देण्यासाठी योजना सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र एसटी प्रवास योजनेचा फायदा विद्यार्थीपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कोणताही व्यक्ती घेऊ शकतो. पारिवारिक सहल किंवा तीर्थक्षेत्र करायचं असेल तर तुम्ही योजनेचा लाभ घेऊन कमी पैशात तुमची सहल पूर्ण करू शकता.
योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रमुख सवलती
साधी बससेवा (लाल बस) – जेष्ठ नागरिकांना राज्यात 7 दिवस प्रवास करण्यासाठी 3171 रुपये ची पास काढावी लागणार तसेच 4 दिवस प्रवास साठी 1814 रुपये ची पास काढावी लागणार आहे. विद्यार्थाना 7 दिवस साठी 1588 रुपये ची पास तर 4 दिवस करीता 910 रुपये ची पास काढावी लागेल.
शिवशाही बस (ऐसी बस) – जेष्ठ नागरिकांना राज्यात 7 दिवस प्रवास करण्यासाठी 4429 रुपये ची पास काढावी लागणार तसेच 4 दिवस प्रवास साठी 2533 रुपये ची पास काढावी लागणार आहे. विद्यार्थाना 7 दिवस साठी 2217 रुपये ची पास तर 4 दिवस करीता 1269 रुपये ची पास काढावी लागेल.
Maharashtra ST Pravas Yojana मुख्य उद्देश
आपल्या राज्यात बहुतांश अशे लोक आहेत ज्यांना फिरायची इच्छा तर खूप असते परंतु काही आर्थिक अडचणी मुळे ते फिरायला कुठे बाहेर जाऊ शकत नाही. अशा सर्व नागरिकांसाठी हि योजना उत्तम आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे कि गरजू नागरिक किंवा गरीब कुटुंबातील नागरिकांना कमी दर मध्ये बस सुविधा उपलब्ध करणे. यामध्ये तुम्हाला फक्त एक पास काढायची आहे आणि तुमाला वाटेल तिथे राज्यात फिरू शकता.
महाराष्ट्र एसटी प्रवास योजनेचा अटी
योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 1814 रुपयांचा पास घ्यावा लागतो, पण या पासची वैधता फक्त 4 ते 7 दिवसांपर्यंतच असते. त्या दिवसांमध्ये तुम्ही एसटी बस ने राज्यात कुठेही मोफत फिरू शकता. यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे पास मिळतील, एक साध्या बससाठी आणि दुसरा शिवशाहीसारख्या एसी बससाठी. तुम्हाला योग्य असेल त्या बसची तुम्ही पास घेऊ शकता.
ऐसी बस ची पास काढण्याचा फायदा असा असतो कि तुम्ही ऐसी आणि साध्या दोन्ही बस मध्ये प्रवास करू शकता. यासाठी तुम्हाला फिरायला जायचा 10 दिवस अगोदर पास ची बुकिंग करणे आवश्यक आहे. हि काढलेली पास हरवली तर त्याचे शुल्क तुम्हाला परत मिळणार नाही आणि बसने प्रवास सुद्धा करता येणार नाही, त्यामुळे पास जपून ठेवावी हि विनंती.
Bandhkam Kamgar Gharkul Yojana Maharashtra 2025: बांधकाम कामगारांसाठी खुशखबर, मिळवा 2.50 लाखांची मदत
योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
- महिला
- विद्यार्थी
- जेष्ठ नागरिक
- अपंग
- शेतकरी
- रुग्ण
लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा
Maharashtra ST Pravas Yojana साठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही जवळच्या एसटी डेपोमध्ये जा. तिथून सवलत योजनेचा फॉर्म घ्या, फॉर्ममध्ये तुमची माहिती नीट भरा, लागणारी कागदपत्रे लावा आणि तो फॉर्म डेपोमध्येच जमा करा. हि प्रक्रिया तुम्हाला 10 दिवस अगोदर करायची आहे.
निष्कर्ष
Maharashtra ST Pravas Yojana हि योजना राज्यातील नागरिकांसाठी वरदान ठरली आहे. कमी दरात नागरिक आता राज्यात कुठेही प्रवास करू शकतात. तुम्ही पण जर या योजनेसाठी पात्र असाल तर नक्की लाभ घ्या. अश्याच योजनांचा माहिती साठी आमचा व्हाट्स अँप ग्रुप ला जॉईन करा. धन्यवाद!
FAQ
1)सवलत पासचा गैरवापर झाल्यास काय होईल?
जर कोणी सवलत पासचा गैरवापर केला, तर त्याचा पास रद्द केला जाईल व दंडही आकारला जाऊ शकतो. पास फक्त संबंधित व्यक्तीनेच वापरावा लागतो.
2)एसटी तिकीट सवलत योजना महाराष्ट्रात सर्वत्र लागू आहे का?
होय, ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे, मात्र काही योजना जिल्हा किंवा विभाग स्तरावर वैध असतात. तपशीलासाठी स्थानिक एसटी डेपोशी संपर्क साधावा.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!